मुंबई दि ६ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. आत राज ठाकरेंही वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आल आहे. पण युतीचा निर्णय राज ठाकरे घेतील अशी माहिती मनसे नेते देत आहेत.
मनसे- शिंदे गटाचा युतीचा निर्णय अजून झालेला नाही असे किरण पावसकर यांनी सांगीतले आहे पण हिंदुत्वावरून मन एकत्र असतील तर गैर काय ? असा सवाल करत युती होऊ शकते असे संकेत दिले आहेत.युती बाबात अजून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज्यात भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरु आहे. पण काल भाजपाने फक्त भाजपाचा नारा दिल्याने मनसे शिंदे गटाची युती करुन निवडणूकीनंतर भाजपासोबत ही युती जाण्याची शक्यता आहे. यावेळेच्या दसरा मेळाव्याला शिंदे गटानेही अर्ज केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. मनसे यांनी प्रमुख पाहुणे उपस्थित रहावे याकरिता शिंदे गट जोरदार प्रयत्न करत आहे. हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे सध्या दोन्हीबाजूनी युतीसाठी अनुकूलता असल्याचे दिसत आहे.
अर्थात याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण भाजपाचे अमित शहा यांनी दिलेल्या फक्त भाजपा घोषणेमुळे मनसे शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चेला जोर आला आहे. ही युती झाली तर उद्धव ठाकरे यांना आपला गड संभाळताना भाजपा मनसे आणि शिंदे गटाला धोपवण्याचे काम करावे लागणार आहे.