‘एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता’
शिंदे गटातील माजी मंत्र्याचे मोठे विधान, शिंदे गटातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर
मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर केलेला दावा अनेकांना पटलेला नाही आता तर शिंदे गटातील आमदारांनीच एकनाथ शिंदेनी पक्षावर दावा करायला नको होता असे विधान केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असुन गटातील बेदिली समोर आली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना पदावरून खाली केल्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल सहानभुती आहे. ती सहानभुती आजही कायम आहे. शिवसेनेत फूट पडल्याने राज्यातील जनतेत जे नकारात्मक वातावरण झाले आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे नकारात्मता मोडून काढतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथेपर्यंत ठिक होतं. मात्र, धनुष्यबाण आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदेंनी केलेला दावा टाळायला पाहिजे होता. हे एकनाथ शिंदेंना बोलून दाखवले होते. असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. पण या दाव्यामुळे शिवसेनेवर दावा करण्यावरून शिंदे गटातील मतभेद समोर आले आहेत.
मंत्रीमंडळ विस्तारावर बोलताना “येणारं सरकार लहान पक्षाचं असेल, असं बोललो होतो. त्याच्या दोन दिवसानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. लोकांना वाटलं हे मी केले पण असे काही नसून, मी केलं असतं तर पहिल्या मंत्रीमंडळात समाविष्ट केलं नसतं का? असा प्रतिप्रश्न बच्चू कडू यांनी विचारला आहे. पण त्याच वेळी दिव्यांग मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.