Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती’

शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांचा धक्कादायक गाैप्यस्फोट, वर्षानंतर सांगितली बंडाची इनसाईड स्टोरी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलं. याला आता एक वर्ष झाले आहे. पण आता मंत्री दिपक केसरकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता. तो यशस्वी झाला नसता तर शिंदेनी गोळी झाडून घेतली असती, असा दावा केसरकर यांनी केला आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर दिपक केसरकर यांनी हे विधान केले आहे. केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हटले ज्यावेळी मला बंड यशस्वी होईल की नाही, असे वाटत होते, त्यावेळी एकच केले असते, माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवले असतं, एक फोन करून माझी चुक झाली, यात आमदारांची काही चूक नाही, असे सांगून तिथेच डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असे केसरकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर “शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला, तेव्हा त्यांना वाटलं की हे लोक प्रेमाने आले आहेत. ज्या दिवशी त्यांचा अपमान झाला तोसुद्धा दिवस वर्धापन दिनाचा होता. तुमच्या सगळ्यात एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केलात. त्याला अत्यंत अपमानित केले, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते आमचेही विधीमंडळ नेते होते. त्यांचा अपमान तुम्ही का केला याचं उत्तर तुम्ही दिले पाहिजे. ते रागवून जरी गेले होते तरी त्यांनी परत येण्याचीही तयारी दाखवली होती,” असे देखील केसरकर म्हणाले आहेत. आमदारांचे नुकसान होऊ नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार तर कोणाच्या मागे राहणार असा सवाल देखील दिपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.

दिपक केसरकर यांनी केलेल्या या खळबळजनक खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले ‘खरं म्हणजे याबद्दल दिपक केसरकर यांना ताब्यात घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतोय आणि ते केसरकर यांना माहित आहे. उद्या जर त्यांनी आत्महत्या केली. विधानसभा अध्यक्षांनी घटनेला स्मरून निकाल दिला. एक वर्षानंतर आज गौप्यस्फोट करतायत?’ अशी विचारणा राऊत यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!