मध्यप्रदेश- मध्यप्रदेशमधील छतरपूर येथील बागेश्वर धाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागेश्वर धाम येथे अर्ज करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली.
मागील एक महिन्यात बागेश्वर धाममध्ये चार मृतदेह सापडले. मंगळवारी रात्री उशिरा ज्या मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, त्या व्यक्तीचा मृतदेह बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी व बागेश्वर धाम दरबारात अर्ज करण्यासाठी आला होता, असं सांगण्यात येत आहे. महिन्यात चार मृतदेह सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो व्यक्ती बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी आला होता.तो मृतदेह बागेश्वर धामच्या बायपास रोडवर आढळून आला. ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरा मृतदेह सापडल्याने स्थानिक पोलिसांमध्ये घबराट पसरली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या स्थानिक बामिठा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे तो मूळचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १ महिन्यात बागेश्वर धाममध्ये चौथा मृतदेह सापडला आहे.
यापूर्वी १७ जून रोजी गाडा गावात असलेल्या बागेश्वर धाममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर कपडे नव्हते. त्यावेळी त्याची ओळखही पटू शकली नाही. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी बागेश्वर धाममध्येही एक मृतदेह सापडला होता. दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बागेश्वर धामजवळील गावात आढळून आला. बागेश्वर धाममध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत.
बागेश्वर धामच्या सुरक्षेबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मंगळवारी मृतदेह सापडण्यापूर्वीच एक मुस्लीम तरुण बागेश्वर धाम आवारात चाकू घेऊन घुसला होता. तो निर्भयपणे प्रदक्षिणा मार्गावर फिरत होता. शस्त्रधारी तरुणाला पाहून तेथे उपस्थित भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. याची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.