काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्येचा ठाकरे गटात प्रवेश
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची ठाकरे गटाकडून कोंडी, गोंगालेंच्या मैदानात ठाकरेंची मशाल
महाड दि ६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे आज बारसूला भेट देत रिफायनरी प्रकल्पावरुन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. पण याच वेळी शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांना पर्याय म्हणून महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या निमित्ताने गोगावलेंच्या मतदार संघात ठाकरे शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. स्नेहल जगताप आगामी विधानसभेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार असणार आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली होती. मात्र स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे ही पोकळी भरून निघण्यास मदत होणार आहे. या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आ भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्नेहल जगताप यांच्या कार्यशैलीवर प्रभावित झाले. तसेच आमदार गोगावले यांच्या कार्य पध्दतीवर नाराजी व्यक्त केली. रोजगार, कारखानदारी, आरोग्य सुविधा यासाठी पुढील निवडणुकीत मैदानात उतरण्याची तयारी स्नेहल जगाताप यांनी केली आहे. आपण घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतल्याचं स्नेहल यांनी सांगितले आहे. शिंदे गटातील आमदारांना कोणत्याही स्थितीत पराभूत करण्याची रणनीती विरोधकांकडून सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाड मतदारसंघात रंगेल. मात्र, ठाकरे गटाकडं आमदार गोगावले यांना टक्कर देऊ शकेल, असा चेहरा नसल्यानं महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडी करून उमेदवारी मिळाली नाही तर आपली भूमिका काय असेल अशी विचारणा केली असता, आमचा निर्णय कोणत्या स्वरूपात बदलणार नसल्याचं सुनील जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी महाडमधील चांदे मैदानावर पूर्ण झाली आहे. ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातून माणिकराव जगताप यांचे अनेक समर्थक यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.