Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा

मॅनेजर अन् वेटरला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, जोडप्यालाही केली मारहाण, काय घडले?

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. पण आता सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पुण्यात दादागिरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण पुण्यात फुकट दारुची मागणी करत एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विकास अबने असे या अधिकाऱ्याचं नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील ड्रामा नाईन हॉटेलमध्ये एका एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकारी हाॅटेल बंद झाल्यानंतर आला. आणि त्याने फुकट दारूची मागणी केली. त्याला नकार दिल्याने तो अधिकारी चिढला. दारु मिळत नसल्यामुळे विकास अबने याने हॉटेलच्या मॅनेजरशी वाद घालणे सुरु केले. त्यावेळी हॉटेलचे इतर कर्मचारी जमा झाले. यावेळी वाद वाढत गेला. यावेळी त्याने जोरदार धिंगाणा घातला. पुढे या अधिकाऱ्याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला बेदम मारहाण करत हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच अधिकाऱ्याने हॉटेल बाहेर एका जोडप्याला मारहाण केल्याचेही उघड झाले आहे. मारहाण करणारा हा अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण याविषयी पोलिसांना कोणतीही माहिती नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पुण्यात दिवसेंदिवस गु्न्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. कोयता गँग, बलात्कार, हत्या आणि मारहाण अशा बऱ्याच घटना पुण्यात घडल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलीस अडचणीत आहेत. त्यातच आता हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!