Latest Marathi News
Ganesh J GIF

नागपुरात खळबळ! NGO च्या नावाखाली धर्मांतराचा डाव उघड!

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीतील कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणानं संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच या प्रकरणाच्या तपासात रोज नवे खुलासे होत आहे. असे असताना उप राजधानी नागपुरात देखील असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे .

नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’या नामांकित एनजीओमध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींवर इस्लाममध्ये पाळले जाणारे काही धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात झालेल्या तक्रारीतून हा धक्का दायक प्रकार समोर आला आहे.

एनजीओचे संचालक ‘रियाज काजी’ तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातील काही तरुणींवर तुम्ही नमाज पठण केले पाहिजे, रोजे ठेवले पाहिजे, दुवा मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोलले पाहिजे, असं दबाव आणत असल्याचा आरोप तिथे काम करणाऱ्या तरुणींनी केला आहे.

मात्र, एनजीओचा प्रमुख असून ही तरुणींनी आपल्या धार्मिक विश्वासाच्या विरोधात जाऊन परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतरही वारंवार रियाज काजी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा, असा तक्रारकर्त्या तरुणींचा आरोप आहे.

एवढेच नाही तर, चार पैकी एका तरुणीने रियाज काझीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचे आरोप ही केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी रियाज काजी (48 वर्ष) या एनजीओ प्रमुखाला अटक केली असून याप्रकरणी त्याला साथ देणारे आणखी कोणी आहेत का? या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडवून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओमध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून देणाऱ्या आणखी काही महिला आहेत का? आणि त्यांनी नोकरी का सोडली? या एनजीओला फंडिंग कुठून मिळते? याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!