Latest Marathi News
Ganesh J GIF

अयानचा तो ‘भयाण’ चेहरा आणि ३ मोबाईलमधील काळी गुपिते!

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील ‘व्हिडीओ कांड’ प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेल्या पाच मोबाईलपैकी तीन मोबाईलचा डेटा पोलिसांना प्राप्त झाला असून, आता या डेटाच्या सखोल विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात आरोर्पीकडून जप्त तीन मोबाईलचा फॉरेन्सिक डाटा तपासण्यात येत आहे व त्याअनुषंगाने पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती ग्रामिण पोलिसांकडून शनिवारी देण्यात आली.

आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटोग्राफ्स डिलीट केल्याचे समोर आले. मात्र, फॉरेन्सिक तपासणीत तीन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यात आरोपी आणि पीडितांमधील संवाद, कॉल रेकॉर्डस्, गॅलरीतील फोटो आणि व्हिडीओंचा समावेश असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत १८ व्हिडीओ आणि ३९ फोटोग्राफ्स समोर आले आहेत. लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि टॅब देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले जाणार असून, त्यातून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

अचलपूरचे एसडीपीओ व सहायक पोलिस अधीक्षक तथा एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याची चर्चा देशभर झाल्यानंतर अयान अहमदच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये तब्बल ४ हजारांनी वाढ झाली आहे. प्रकरण उघड होण्यापूर्वी अयानचे १८ हजारांच्या घरात फॉलोअर्स होते. ते आता वाढून २२ हजारांवर पोहोचले आहे. अयान हा सोशल मीडिया ब्लॉगर होता. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह असे व्हायरल झाले नाही. त्यामुळे त्याच्या अकाऊंटमधून काही लिंक डिलीट केल्या असल्या तरी त्याचे अकाऊंट सुरू असल्याची माहिती आयपीएस शुभम कुमार यांनी दिली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!