प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या अभिनेत्या पतीला देणार घटस्फोट
सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, चाहत्यांना धक्का, म्हणाली नातेसंबंधनाचा शेवट हा कटू...
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे अनेक बाॅलीवूड स्टार विवाह बंधनात अडकत असताना, दुसरीकडे मात्र काही जोड्या वेगळ्या होत आहेत. आता सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर अभिनेत्री कुशा कपिला पती जोरावर सिंग अहलुवालियाला घटस्फोट देणार आहे. तिने वेगळा होण्याचा निर्णय चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर प्रेक्षकांना आपल्या व्हिडिओतून पोट धरु हसायला लावणारी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला लवकरच घटस्फोट घेणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिलं आहे,”जोरावर आणि मी परस्पर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा निर्णय खरचं सोपा नव्हता. पण आयुष्यातील या टप्प्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे. नातेसंबंधनाचा शेवट हा कटू असतो. आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी हे खरचं खूप कठीण होतं. आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. परंतू आम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला आहे. आता आयुष्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. आम्ही एकमेकांचा नक्कीच आदर करतो. अशी भावना तिने व्यक्त केली आहे. कुशा आणि जोरावर अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले. पण सहा वर्षानंतर ते आता वेगळे होणार आहेत. कुशाने अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ आणि रितेश देशमुखच्या ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या सिनेमातदेखील तिने काम केलं आहे. तसेच छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली होती. तिचा पती जोरावर देखील याच क्षेत्रात कार्यरत होता.
यशस्वी मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला मोठ्या शोमध्ये सहभागी होण्याचे चांगलेच पैसे घेते. तसेच तिचा युटुब चॅनेल असून त्यामधून ती लाखो रुपये कमावते. कुशा कपिलाची अंदाजे एकूण २० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती यंदा पार पडलेल्या कान्समध्ये सहभागी झाली होती.