Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रतिक्षा संपली! विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर

या दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, पहा भारताच्या सामन्याचे वेळापत्रक, या ठिकाणी अंतिम लढत

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- भारतात खेळवल्या जाणाऱ्या २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलेले आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा सुरु होण्याच्या १०० दिवस आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडू वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे एका कार्यक्रमात वेळापत्रक जाहीर करण्यात आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. यजमान संघ भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ५ वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. तर भारत आणि पाकिस्तानमधील पहिला सामना १५ ऑक्टोबर २०२३ ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. दरम्यान पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. पण ती अमान्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने सरकारने परवानगी दिली तरच आपण भारतात जावू असे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने शेवटचा टी२० विश्वचषक २०१६ मध्ये भारतात खेळला होता.
एकूण दहा शहरात हे सामने होणार आहेत हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरात सामने होणार आहेत.


भारतीय संघाचे वेळापत्रक
८ऑक्टोबर वि ऑस्ट्रेलिया चेन्नई
११ ऑक्टोबर वि अफगाणिस्तान दिल्ली १
१५ ऑक्टोबर वि पाकिस्तान अहमदाबाद
१९ ऑक्टोबर वि बांगलादेश पुणे
२२ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड धरमशाला
२९ ऑक्टोबर वि. इंग्लंड लखनऊ
२ नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ मुंबई
५ नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता
११ नोव्हेंबर वि. क्वालिफायर १ बंगळुरू

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!