ईडीने अटक करताच हे कॅबिनेट मंत्री चक्क रडू लागले
मंत्री रडतानाचा व्हिडीओ व्हायरल, ईडीने अटक करताच छातीत कळा येण्यास सुरूवात, उपचार सुरु
चैन्नई दि १४(प्रतिनिधी)- मनी लाँड्रिंग प्रकरणात तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान त्यांना अक्षरशः रडू कोसळले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सेंथिल बालाजी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले. त्यांच्या सखोल चौकशीनंतर आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्याने व्ही. सेंथिल बालाजी यांना अटक केली. अधिकारी जसेही सेंथिल यांना घेऊन जायला निघाले, त्याक्षणी रडू लागले. दरम्यान भाजप राजनितीक स्वरुपात ज्यांचा सामना करू शकत नाही त्यांना अशा पद्धतीने घाबरविण्याचे राजकारण यशस्वी होणार नाही. बालाजी यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने बालाजी यांच्याविरुद्ध कथित कॅश फॉर जॉब घोटाळ्यात पोलीस आणि ईडी चौकशीसाठी परवानगी दिली होती. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यातील तरतुदींनुसार छापेमारी केली आहे. बालाजी राज्याचा अबकारी विभाग देखील सांभाळत आहेत. मागील महिन्यात आयकर विभागाने बालाजी यांच्या निकटवर्तियांच्या ठिकाणी छापे टाकले होते. आज प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने सेंथिल बालाजी यांना ताब्यात घेतले तेव्हा त्यानी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी चेन्नईतील ओमंडुरार सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे ते वेदनेमुळे रडताना दिसले. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करताना दिसले.
रूग्णालयात बालाजी यांना बायपास सर्जरी करायला सांगितले आहे. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असून, लवकरात लवकर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात त्यांची कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली होती. सेंथिल बालाजी हे सध्या तामिळनाडू सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आहेत. यापूर्वी ते AIADMK सरकारमध्ये परिवहन मंत्री होते.