Latest Marathi News
Ganesh J GIF

लज्जास्पद! आरसीबीच्या चाहत्यांकडून शुभमन गिलच्या बहिणीला शिविगाळ

आरसीबीच्या पराभवामुळे चाहते बिथरले, महिला आयोगाचा ट्रोलर्सना इशारा, अपशब्द वापरल्यास..

बेंगलोर दि २३(प्रतिनिधी)- आयपीएल आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आले आहे. गुजरात, चेन्नई, लखनऊ आणि मुंबई हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. याआधी झालेल्या गुजरात विरूद्ध आसबीचा सामना फारच रोमांचक झाली त्या सामन्यात शुभमन गिलने केलेल्या शतकी कामगिरीमुळे बेंगलोरचा पराभव झाला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले. हा सामना आरसीबी चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे कारण त्यांनी लाजीरवाणे कृत्य केले आहे.

शुभमन गिल याच्या शतकी खेळीनंतर बहिणीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. शाहनील गिल हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी गिलच्या बहिणीला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली आहे. तसेच इन्स्टाग्रामवर देखील अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. शुभमन गिल याच्या शतकामुळे आरसीबी प्लेऑफमधून बाहेर गेली, असा समज करत चाहत्यांनी गिलच्या बहिणीला शिव्या दिल्या आहेत. पण आता गिलच्या बहिणीसाठी महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत तसे संकेत दिले आहेत. शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोल करणे लज्जास्पद आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या मुलीला शिवीगाळ करणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू केली होती. गिलच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सर्वांवर महिला आयोग कारवाई करेल. असे काहीही खपवून घेतले जाणार नाही. असे सांगितले आहे. दरम्यान आरसीबीचा पराभव त्यांच्या चाहत्यांना पचवता आला नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर शुभमन गिल आणि त्याच्या बहिणीला शिवीगाळ केली, प्रकार त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.


गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात शुभमन गिलच्या शानदार शतकामुळे टायटन्सने बंगळुरूचा पराभव केला. यामुळे बंगळुरू स्पर्धेतून बाहेर पडला. या सामन्यात गिलने ५२ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी करत बेंगळुरूला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!