Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नानंतर या अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केला साजशृंगारातील व्हिडिओ

व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव

पुणे दि ११(प्रतिनिधी) – अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अक्षयाने लग्नानंतर पहिल्यांदाच नववधूच्या साजश्रृंगारातील व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हार्दिक-अक्षयाने नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

अक्षयाच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात लाल रंगाची साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज अक्षयाने परिधान केला आहे. हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू व नाकात नथ असा श्रृगांर अक्षयाने केलेला दिसत आहे. या व्हिडीओला तिने जरीच्या साडीत हे गाणेही वापरण्यात आले आहे. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पती हार्दिक जोशीला टॅग करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षयाचा मराठमोळा लुक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अक्षया-हार्दिकच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली राणादा-पाठकबाईंची जोडी खऱ्या आयुष्यातही लग्नाच्या बेडीत अडकल्याने चाहतेही आनंदी आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!