Latest Marathi News

शिंदे गटात एकमेकाला लाठ्याकाट्यांनी मारहाण

शिंदे गटात जोरदार राडा, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

उल्हासनगर दि १२(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत विकासकामांवर भर देणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटातच जोरदार राडा झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांना अक्षरश: लाठ्या काठ्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाय कायदासुव्यवस्थेचा मुद्दा समोर आला आहे.

व्हीनस चौक ते श्रीराम चौक असा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.या रस्त्याच्या श्रेयावरून शिंदे गटातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचा पती वसंत भोईर आणि युवसेना संपर्क प्रमुख विजय जोशी यांच्यात वाद होते.हे दोन्ही गट रस्त्याच्या कामाच्या पाहणीच्या निमित्ताने समोर समोर आले आणि त्यांच्यात वाद झाला.दोन्ही गटाकडून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली, या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहे.एसएसटी कॉलेज समोर हा राडा झाला आहे.

हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे.पण शिंदे गटातील ही दुफळी या निमित्ताने समोर आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!