चार मुलींनी एका तरुणीला भररस्त्यात लाथा बुक्क्यानीं मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल, मारहाणीत तरुणीची अवस्था...
इंदूर दि ८(प्रतिनिधी)- मुलांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील पण अलीकडच्या काळात मुलींच्या मारामारीचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत सध्या सोशल मिडीयावर असाच एक मुलींच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दारूच्या नशेत चार मुलींना एका मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ इंदूरमधील आहे. इंदूरमधील एलआयजी तिराहे येथे मध्यरात्री दारूच्या नशेत मुलींनी गोंधळ घातला. चार मुलींनी एका मुलीला रस्त्यावर शिविगाळ करत बेदम मारहाण केली.तसेच तिचा मोबाईलही फोडण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओत तीन मुली एका मुलीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत आहे. पण मारहणीमुळे रस्त्यावर पडलेली मुलगी बेशुद्ध झाली होती. पण मदतीसाठी कोणीच पुढे आले नाही. तेथे उपस्थित लोकांनी मुलींमधील वादाचा हा व्हिडिओ बनवला आहे. तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

उड़ता इंदौर.. नशे में धुत्त लड़कियों का पब के बाहर मारपीट का वायरल वीडियो @NCMIndiaa @DeepikaBhardwaj @voiceformenhind pic.twitter.com/ZXt8Q8OzaP
— सत्यनिष्ठा (@esp_india) November 7, 2022
याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच व्हायरल व्हिडिओ हा दोन दिवसांपूर्वीचा आहे. इंदूरच्या बीआरटीएस कॉरिडॉरच्या बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.