Just another WordPress site

पंतला पाहून प्रेक्षक म्हणाले ‘भाई उर्वशी बुला रही है’!

प्रेक्षकांनी खेचली रिषभची टांग, चिडलेल्या रिषभने केले भलतेच...

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी २० वल्डकप खेळत आहे. गुरूवारी भारताचा सामना इंग्लडबरोबर होणार आहे. यात भारत विजयी झाल्यास अंतिम फेरीत पोहोचणार आहे. यावेळी भारतीय संघात कमी आणि संघाबाहेर राहिलेला रिषभ पंत सोशल मिडीयावर चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. अभिनेत्री उर्वशी रोतेलामुळे तो ट्रोल होत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेपूर्वी उर्वशीने दिलेल्या एका मुलाखतीवरून मोठा वाद निर्माण झाला होता त्याला रिषभने उत्तरही दिले होते. त्यानंतर उर्वशीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून माफी मागितली होती तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात वल्डकप खेळण्यासाठी गेल्यावर उर्वशीही तिथे दाखल झाली होती. त्यामुळे रिषभ सोशल मिडीयावर ट्रोलर्सच्या निशान्यावर आला होता. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाउंड्रीजवळून चालत असताना पंतला प्रेक्षकामधून एकाने अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाने चिडवत ‘भाई उर्वशी बुला रही है!’ असा टोमणा मारला त्यावर चिडलेल्या पंतनेही त्याला भन्नाट उत्तरं दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रिषभला इंग्लंडविरुद्ध संघात घ्यावे अशी मागणी आहे.पण, सध्या तरी रिषभ पंत खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्याचं काम करत आहे.

GIF Advt

रिषभ पंतला अशाप्रकारे चिडविण्याची ही पहिलच वेळ नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पंतला उर्वशीच्या नावाने चिडविण्यात आले होते. सोशल मीडियावर उर्वशी-पंतवरुन अनेक मीम्सदेखील पहायला मिळाले आहेत. सध्या रिषभ आणि उर्वशीत कुठलाही वाद होत नसला तरीही प्रेक्षक ऋषभची टांग खेचताना दिसत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!