Just another WordPress site

रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल

पिंपरी चिंचवड दि २१(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. पिंपरी कॅम्पच्या भर चौकात ही हाणामारी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.रिक्षाचा फोटो काढल्याच्या वादातून ही मारहाण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार नो एन्ट्रीमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाचा वाहतूक पोलिसांने फोटो काढला. मात्र रिक्षात पत्नी बसलेली आहे असे सांगूनही दंड आकारला जात असल्याने रिक्षा चालकाने पोलिसांना अपशब्द वापरले. तुम्ही अशा पावत्या फाडता म्हणूनच तुमचा मृत्यू होतो. सर्वांसमोर असे रिक्षाचालक म्हणताच वाहतूक पोलिस संतापले. त्यामुळे पोलिसाने रिक्षा चालकावर हात उगारला. रिक्षा चालकाने लगेच हात उचलला. आणि दोघात फ्री स्टाईल हाणामारी झाली.रिक्षा चालकाने मद्यपान केल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.पण रक्षणकर्ता पोलीसावरच हल्ले होत असतील तर कायदा सुव्यवस्था कशी राखली जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

GIF Advt

या घटनेच्या आधीही पोलीसांवर हल्ले करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत हवालदाराला मारहाण करण्यात आली होती तर धानोरीतही पोलिसाला मारहाण करण्याची घटना घडली होती.तर गाडीवर पोलिसाला फरफटत घेऊन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!