Latest Marathi News
Ganesh J GIF

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पोलीसांच्या तपासात धक्कादायक खुलासा, व्हायरल व्हिडिओवर गाैतमी म्हणाली...

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका मुलाला नोटिस बजावली आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिस चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. तो म्हणजे ताब्यात घेतलेला मुलगा १७ वर्षाचा असून त्याने गौतमी पाटील हिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट बनलले होते. याच बनावट अकाउंटवरून आरोपी मुलाने गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल केले होते. धक्कादायक बाब समोर आली असून ती म्हणजे आरोपी मुलाने या कामासाठी वापरलेले सिमकार्ड त्याच्या आईच्या नावावर घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी मुलाच्या आई-वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहाण्यास सांगितले आहे. दरम्यान गौतमी पाटील हिचा खासगी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश सायबर पोलिसांना दिले होते.

गौतमीने पोलिसांच्या कारवाईवर समाधान देखील व्यक्त केले आहे. ती म्हणाली, आरोपी अल्पवयीन असला तरी त्याने चुकीचं काम केलं आहे. त्याने तो व्हिडिओ व्हायरल करून गुन्हा केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत. त्यांना देखील पोलिस ताब्यात घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!