Latest Marathi News
Ganesh J GIF

गाैतमीचे आडनाव पाटील नाही? गाैतमीच्या आडनावावरून घमासान?

पाटील आडनाव न वापरण्याचा गाैतमीला इशारा तर गाैतमी म्हणाली मला फरक पडत..

पुणे दि २६(प्रतिनिधी)- वाद आणि गाैतमी पाटील हे आजकाल नवीन समीकरण बनले आहे. आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. सबसे कातील गाैतमी पाटील असे समीकरण देखील रूढ झाले आहे. पण ही गाैतमी पुन्हा एकदा वादात सापडली आहे.


गौतमी पाटील हिच्या आडनावावरून पुण्यात मराठा संघटनेची बैठक झाली. यात गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. असा दावा करण्यात आला आहे. गौतमी पाटील हे नाव वापरून ती पाटील नावाची बदनामी करत आहे. तिने हे आडनाव लावू नये, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला होता. त्यामुळे ती पुन्हा एकदा टिकेचे धनी बनली होती. पण आता गाैतमीने याला सडेतोड उत्तर दिले आहे. गाैतमी म्हणाली की, मी पाटील आहे तर पाटीलच आडनाव वापरणार. कुणी काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही. त्याचबरोबर मी कुणाची कसलीही बदनामी करत नाही. कुणाला माझ्या कार्यक्रमावर आक्षेप घ्यायचा असेल, तर त्यांनी आधी येऊन कार्यक्रम बघावं आणि मग बोलावं.’ असे सडेतोड उत्तर तिने दिले आहे. त्यामुळे आडनावावरून सुरू असलेला वाद थांबणार की आणखी चिघळणार हे पहावे लागेल.

अल्पवधीत प्रसिद्ध झालेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आता गुन्हा दाखल होण्याचे प्रकार घडत आहेत. कार्यक्रमाला परवानगी नाकारलेली असतानाही कार्यक्रम घेतल्याने पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. बर्थडे बॉयसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!