
या प्रसिद्ध अभिनेत्रीला जवळच्याच लोकांनी केली मारहाण
मारहाणीचा व्हिडीओही केला व्हायरल, पोलीसांवरही केले गंभीर आरोप, काय घडले?
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- सेलिब्रेटी यांच्यासोबत अलीकडच्या काळात हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. आता ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गोरी नागोरीला मारहाण करण्यात आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तो व्हिडिओही व्हायरल झाली आहे. याची चर्चा होत आहे.
गाैरीने यावेळी तक्रार करण्यासाठी पोलीसांकडे आलेला धक्कादायक अनुभव देखील चाहत्यांना सांगितला आहे. गाैरी बहिणीच्या लग्नासाठी अजमेरमधील किशनगड येथे पोहोचल्यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. गोरीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,”नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी गोरी…आज माझ्यासोबत घडलेला प्रकार कोणासोबत घडू नये. त्यामुळे मुद्दाम मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीचं २२ मे रोजी लग्न होतं. मी शहरात राहते आणि मला वडील आणि भाऊ नाही. तर माझा एक मोठा मेहुणा आहे. त्याचं नाव जावेद आहे. त्याने सांगितलं की हे लग्न किशनगडमध्ये करा… मी सर्व व्यवस्था करीन, मेहुण्याच्या सांगण्यावरुन मी किशनगडमध्ये लग्न केले होते. पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की हा त्याचा कट होता. किशनगडमध्ये माझ्यासह संपूर्ण टीमवर मेव्हण्याने आणि त्याच्या मित्राच्या भावाने खूप वाईट हल्ला आमच्यावर केला आहे. दरम्यान आम्हाला मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे हे घरगुती प्रकरण असल्याचे ते घरीच सोडवा असा सल्ला देखील पोलिसांनी दिला.
गोरी ही मुलगी आहे, तिच्या जीवाचं काय बरं-वाईट झालं तर अशी तिला भीती वाटत आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने लवकरात लवकर सुरक्षा द्यावी आणि न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती गोरीने यावेळी केली आहे. गाैरीचे खरे नाव तस्लिमा बानो आहे.नृत्यविश्वातील भारतीय शकीरा म्हणून प्रसिद्ध आहे.