Just another WordPress site

बीसीआयच्या अध्यक्षपदावरुन गांगुलीचा गेम करत पत्ता कट

बीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी या दिग्गज खेळाडूच्या हाती

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले रॉजर बिन्नी आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहे. तर आशिष शेलार बीसीसीआयचे नवे कोषाध्यक्ष असणार आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.

पदाधिकारी निवडीसाठी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील ताज हॉटेलमध्‍ये बैठक झाली. यावेळी अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी जय शहा तर काेषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविराेध निवड झाली. तर संयुक्‍त सचिवपदी देवाजीत सैकिया तर आयपीएल चेअरमनपदी अरुण धूमल यांची निवड झाली आहे. ‘दादा’ म्हणजेच सोैरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहायचे होते, पण बीसीसीयच्या सदस्यांनी त्याला विरोध केल्याची चर्चा आहे. गांगुलीला अध्यक्षपदाच्या बदल्यात आयपीएल चेअरमनपदची ऑफरही देण्यात आली होती तर आयसीसीवर जाण्याचीही शक्यता मावळली आहे. आता गांगुलीने पुन्हा क्रिकेट असोसिएशन बंगालच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

GIF Advt

कर्नाटक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या बिन्नींकडे आता बीसीसीआयची धुरा असणार आहे. तर शेलार कोषाध्यक्ष असणार आहेत.
बीसीसीआयची नवी टीम

अध्यक्ष – रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
सचिव – जय शाह ( गुजरात)
उपाध्यक्ष – राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
खजिनदार – आशिष शेलार ( महाराष्ट्र)
सर चिटणीस – देवाजित सैकिया ( आसाम)
आयपीएल चेअरमन – अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!