Latest Marathi News
Ganesh J GIF

जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ

न्यायालयीन सुनावणीत राऊतांना धक्का, खडसेंशी 'या' विषयावर चर्चा

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात  अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कायम आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी देखील तुरुंगातच जाते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. राऊत यांची जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी ही आज एकाचवेळी झाली. याप्रकरणी त्यांना न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी आज सायंकाळपर्यंत अजून काही मुद्दे लेखी स्वरुपात कोर्टात सादर करणार आहेत. मात्र, हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने व्यवस्थित अभ्यास करावा लागणार असल्याचे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले. कोर्टाने बचाव पक्षाचा देखील युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २१ ऑक्टोबरला सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगामधील मुक्कामी आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची दिवाळी देखील तुरुंगातच जाते की काय, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

तत्पूर्वी मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट झाली. खडसेंनी राऊतांची चौकशी केली असता, ‘संगळं ठिक, चिंता नको, लवकर बाहेर येईन,’ असा विश्वास संजय राऊत यांनी खडसेंना दिला आहे. ही माहिती खडसेंनी स्वतः दिली. भेटीदरम्यान दोघांमध्ये औपचारिक चर्चा झाल्या असल्याची चर्चा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!