अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम
अर्थसंकल्प सादर करताना केला विक्रम, पहा सीतारामन यांचा अनोखा विक्रम
दिल्ली दि १(प्रतिनिधी) – भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. हा एक विक्रम आहे.

सलग पाचवेळा अर्थमंत्री म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड निर्मला सीतारामन यांच्या नावे नोंद झाला आहे. या आधी माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम , यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांच्या यादीत आता सहावं नाव हे निर्मला सीतारामन यांचं असणार आहे. देशात २०१४ साली मोदी सरकार आल्यानंतर अरूण जेटली यांनी सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला. अरूण जेटलींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पीयूष गोयल यांनी २०१९-२० साठी अंतरिम अर्थसंकल्प किंवा मतदानाचा अहवाल सादर केला होता. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी २००४ ते २००९ या कालावधीत सलग पाच अर्थसंकल्प सादर केला होता. मनमोहन सिंग यांनी १९९१ ते १९९२ ते १९९५-९६ या कालावधीत अर्थसंकल्प सादर केला होता. त्यातील एक १९९२ चा अर्थसंकल्प उदात्तीकरण करणारा होता.
आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. त्यांनी १९६२ ते १९६९ या कालावधीत दहावेळा अर्थसंकल्प सादर केला होता. पी. चिदंबरम यांच्या नावे नऊवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.