Latest Marathi News
Ganesh J GIF

खुशखबर! राज्यातील महापोलीस भरतीची जाहिरात आली

तब्बल 'इतक्या' जागासाठी असणार भरती, पहा तुमच्या जिल्ह्यात किती जागा भरणार

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने दिवाळी भेट देताना पोलीस दलात १४ हजार ९५६ पदे भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील महिन्यात म्हणजे ३ नोव्हेंबरपासून पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे पाहणे महत्वाचे आहे.

पोलीस भरतीसाठी १ नोव्हेंबरला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांची सर्वप्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून त्यानंतर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यावेळी काही कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. अर्ज प्रकिया आॅनलाईन असल्याने यावेळी शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र. जन्म दाखला. १२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक. अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र. संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून). समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त /३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र. आधारकार्ड (ऐच्छीक). प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) आणि सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

सरकारकडून होणाऱ्या १४९५६ जागांपैकी इडब्लूएससाठी १५४४ तर ५४६८ जागा ओपनसाठी असणार आहेत.

या जिल्ह्यात एवढ्या जागा

मुंबई – ६७४०,, ठाणे शहर – ५२१, पुणे शहर -७२०, पिंपरी चिंचवड – २१६, मिरा भाईंदर – ९८६, नागपूर शहर – ३०८, नवी मुंबई – २०४, अमरावती शहर – २० सोलापूर शहर- ९८, लोहमार्ग मुंबई -६२०, ठाणे ग्रामीण – ६८, रायगड -२७२, पालघर – २११, सिंधूदुर्ग – ९९, रत्नागिरी -१३१, नाशिक ग्रामीण – ४५४, अहमदनगर – १२९, धुळे -४२, कोल्हापूर -२४, पुणे ग्रामीण – ५७९, सातारा -१४५, सोलापूर ग्रामीण -२६, औरंगाबाद ग्रामीण- ३९, नांदेड -१५५, परभणी – ७५, हिंगोली -२१, नागपूर ग्रामीण -१३२, भंडारा -६१, चंद्रपूर -१९४, वर्धा – ९०, गडचिरोली – ३४८, गोंदिया – १७२, अमरावती ग्रामीण -१५६, अकोला – ३२७, बुलढाणा – ५१, यवतमाळ – २४४, लोहमार्ग पुणे – १२४, लोहमार्ग औरंगाबाद -१५४, एकूण – १४९५६

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!