
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुंडांचा गोळीबार
गोळीबारीचे सीसीटीव्ही फुटेज समोर, पोलीस काय म्हणाले पहा...
पुणे दि २५(प्रतिनिधी) – पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हत्या, बलात्कार यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री गोळीबाराची घटना घडली आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये फिर्यादी आणि आरोपी एका हॉटेलमध्ये आले होते. परत जात असताना आरोपीने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला. तर फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ७ ते ८ वेळा समोरच्या व्यक्तींच्या तोंडावर, हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी करुन ते सर्वजण तेथून पळून गेले.मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रांसोबत कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मध्ये मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जमले होते. पार्टी संपल्यानंतर दुचाकीने परत जात असताना रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी सोन्या दोडमनी आणि इतरांनी पूर्वीच्या कारणावरून सागर कोळनटी याच्यावर हल्ला केला. आरोपी सोन्या याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला तर इतर आरोपींनी फुटपाथवर पडलेल्या पेपर ब्लॉकने त्याच्या तोंडावर जबर मारहाण केली. यामध्ये सागर गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत असून सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणीच ही धक्कादायक घटना घडली आहे.


