‘महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात’
अमृता फडणवीसांच्या समोर बाबा रामदेव यांची जीभ घसरली,व्हिडीओ व्हायरल
ठाणे दि २५(प्रतिनिधी)- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलासंदर्भामधील वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट उसळली आहे.अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीही आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानांची प्रकरणे ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीसांसमोरच त्यांनी हे विधान केले आहे.
ठाण्यामधील योगा कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव बाबा यांची जीभ घसरली. रामदेव बाबा म्हणाले की, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांच्या उपस्थित केले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा वाद अधिक चिघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन केले होते. या संमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. परंतु सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांना योग प्रशिक्षण उपक्रम संपन्न झाले. त्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही.यावर बाबा रामदेव यांनी एक विधान करत म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा. महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे रामदेव बाबा त्यावेळी म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर योगगुरु बाबा रामदेव यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. तसेच, अमृता फडणवीस यांचे तरुण राहण्यामागील कारण देखील बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. महिला नेत्यांनी रामदेव बाबांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.