Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर

या मंत्र्यांकडे राहणार या जिल्ह्यांची जबाबदारी पहा यादी

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सरकार स्थापनेपासुन दीड महिन्यांनी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आणि विस्तारानंतर रखडलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर शिंदे सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती पण पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याचे पालकमंत्री पद शंभुराजे देसाई यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना पालघरची जबाबदारी दिली आहे.

पालकमंत्र्याची यादी पुढीलप्रमाणे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

सध्या मंत्रिमंडळात १८ मंत्री असल्यामुळे एका मंत्र्याकडे दोन तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पुढचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळाकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!