Latest Marathi News
Ganesh J GIF

मनी लाँड्रिंग प्रकरणात या अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार?

खंडणी प्रकरणी दोन अभिनेत्रीचे एकमेकींवर गंभीर आरोप, अभिनेत्री न्यायालयात म्हणाली, बळीचा बकरा ..

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- महाठग अशी ओळख असलेला सुकेश चंद्रशेखरने बाॅलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना अडचणीत आणले आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर सुकेशच्या मनी लॉड्रिंग केससंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आज नोराला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी नोरा संशयित आरोपी आहे. गेल्या काही महिन्यापासून नोराची या केससंदर्भात चौकशी होत आहे. नोराला कोर्टानं समन्स बजावल्यामुळे ती आज न्यायालयात हजर झाली होती. सुकेशनं अटक झाल्यानंतर तिहार जेलमधून अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नाव घेतल्याची चर्चा होती. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आणि नोराचा तपास केला जात आहे. दरम्यान जॅकलीन फर्नांडिस हिने आपली बदनामी चालविलेली असल्याचे नोराने तक्रारीत म्हटले आहे. कॅनेडियन नागरिक असलेल्या नोराने महानगर दंडाधिकारी कपिल गुप्ता यांच्यासमोर जबाब नोंदवला. खंडणीच्या प्रकरणात आपणास जाणूनबुजून बळीचा बकरा बनविला जात असल्याचा दावा नोरा हिने न्यायालयात केला आहे. दुसरीकडे ईडीने आरोपपत्र दाखल करताना म्हटले होते की, जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांनी सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत आहे. सुकेशनं अटक झाल्यानंतर तिहार जेलमधून अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नाव घेतल्याची चर्चा होती. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोराचा तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नोरा आणि जॅकलिन चांगल्याच अडकल्या आहेत. सुकेशमुळे नोरा आणि जॅकलीनमध्ये वाद सुरु आहेत.

डान्सर म्हणून ओळखली जाणारी डान्सर नोरा फतेहीही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. नोराचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नोरा लवकरच एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटामध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेजसोबत चित्रपटामध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!