गौतम अदाणींना मागे टाकत हे बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
फोर्ब्स रियल टाइम अब्जाधीशांची नावे समोर, हिंडेनबर्गमुळे अदाणींचे नुकसान
मुंबई दि १(प्रतिनिधी)- भारतात सर्वांत श्रीमंत असणारे उद्योगपती गाैतम अदानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. आता अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणार आहेत.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांची यादी समोर आली आहे. भारताचे दिग्गज उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि भारतीय व्यक्ती बनले आहेत. आठवडाभरापूर्वी आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाले आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे ८४.३ बिलियन डॉलर्स एकूण संपत्तीसह नवव्या क्रमांकावर पोहचले आहेत. तर ८४.१ अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदाणी दहाव्या स्थानावर आले आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार, सध्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती २१४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर ट्विटरचे नवे मालक एलन मस्क आहेत. SpaceX चे संस्थापक आणि टेस्ला कंपनीचे सीईओ मस्क यांची संपत्ती १७८ अब्जांपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे २५ जानेवारीपुर्वी अदानी या यादीत तिसऱ्या स्थानी होती. हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदाणी यांची मोठी घसरण झाली आहे.
अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे दीड लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांची घसरण झाली होती. फोर्ब्सच्या रिअर टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार तिसऱ्या स्थानी जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर लॅरी एलिसन, पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे, सहाव्या स्थानी बिल गेट्स, सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हेलू आणि कुटुंब, आठव्या क्रमांकावर लॅरी पेज आहेत.