Just another WordPress site

भाजपाचे आमदार म्हणतात मुख्यमंत्र्यांची आश्वासने खोटारडी दिशाभूल करणारी

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादात भाजपाकडुन एकनाथ शिंदेंची कोंडी

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असतानाच शिंदे – फडणवीस सरकारमध्ये देखील वाद होत आहेत. जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी  शिंदे – फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

GIF Advt

जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकात जाण्याची घोषणा केल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोघांमध्ये जोरदार संघर्ष होत आहे. त्यातच कर्नाटकमधून या गावांना पाणी सोडण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील तातडीने पावले उचलत ४० गावच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत म्हैसाळ योजनेसाठी दिन हजार कोटींची घोषणा करत लवकर काम सुरु करण्याचे निर्देश दिले पण नेमक्या याच घोषणेमुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत मध्ये पत्रकार परिषद घेत केली आहे ते म्हणाले की,या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी , प्रशासकीय मंजुरी , त्याचे बजेट आणि अजूनही कॅबिनेट समोर विषय आलेला नाही. सह्याद्री वर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच , जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी २०० कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे . परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. असे म्हणत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांवर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. एकीकडे कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचत असताना आता महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातच वाद असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

जगताप यांनी यावेळी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित नव्हते तसेच जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारी देखील उपस्थित नव्हते. मग मुख्यमंत्री कशी काय घोषणा करु शकतात असे म्हणत भाजपाच मोठा पक्ष असल्याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.यावेळी जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते , पाणी योजनांचे जाणव अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा अशी आमची मागणी असल्याचे जगताप म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!