Latest Marathi News
Ganesh J GIF

भोंदू गडगे महाराजांचा लॉकअपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेयाच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे.

सोबतच भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार देखील पोलिसांकडून सिल करण्यातआला. संगमनेर पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा देखीलकेला. यावेळी तपासाचा भाग म्हणून राजेंद्र गडगे याला दत्तधाम दरबारात नेले असता त्याने पोलिसांसमोर छातीठोकपणे अंनिसला थेट आव्हान करीत मला अडकविण्याचा कट असल्याचे म्हटले.

‘मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे. कारण मी आत्मज्ञानी आहे, अशा शब्दांत भोंदूगिरीचा आरोप असलेला राजेंद्र गडगे याने पोलिसांसमोर छातीठोकपणे आपलाम्हणणंमांडलंय. विशेषम्हणजे पोलिसांनी बोलण्यास थांबवल्यानंतरही ‘पोलीस माझा छळ करताय’ असे आरोपही त्याने यावेळीकेली.

संगमनेर पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पाॅट पंचनामा केला. यावेळी पोलीसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेतली. भोंदू गडगेला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालीआहे. परिणामी दाखल गुन्ह्यासंदर्भात पोलीसांकडून तपास सुरू आहे. याचौकशीचाभागम्हणून दरबारातील विविध औषधांचे नमुनेही ताब्यात घेतले आहेत. सध्या भोंदू राजेंद्र गडगेची कसून पोलीस चौकशी सुरु आहे. वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!