Latest Marathi News
Ganesh J GIF

‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? म्हणणारी अभिनेत्री ट्रोल

सोशल मिडीयावर नेटक-यांनी घेतली अभिनेत्रीची शाळा, मराठा आरक्षणावरील पोस्ट व्हायरल, अभिनेत्री नेहमी वादात

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यात काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यावर एका अभिनेत्रीने पोस्ट केली होती. पण ती यामुळे जोरदार ट्रोल झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये मराठा आरक्षणासासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं. काही आंदोलकांनी माझलगाव नगरपरिषदेचं कार्यालय फोडलं. तिथे जाळपोळ केली. तसेच काही जणांनी आमदार प्रकाश सोळंकी यांच्या बंगल्यावर दगडफेक केली होती. तसेच एसटीलाही लक्ष करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे या अभिनेत्रीने एक्सवर एक पोस्ट केली होती. “एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर?” अशी पोस्ट तिनं केली होती. असे ती या पोस्ट मध्ये म्हणाली होती. पण यामुळे केतकी जोरदार ट्रोल झाली आहे. यावर एकानं कमेंट केली आहे की “ताई याआधी ५५ मोर्चे शांततेत काढले होते त्यावेळी झोपला होतात का?”, तर आणखी एकानं म्हंटलंय की “जेव्हा ८०% मिळून तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही, ४०% वाल्या मुलाला सहज मिळते, तेव्हा आरक्षण किती महत्वाचं हे कळतं.” लाईव्ह येऊन डेब्यू करता का ताई मग सांगतो, इतका अभ्यास असेल तर या चर्चा करू, ५५ मोर्चे शांततेत काढले होते, त्यावेळी सरकार आणि तुम्ही झोपले होते का, तुला काय त्रास आहे केतकी आरक्षणाचा?, सध्या वातावरण खराब आहे , अशा पोस्ट करू नका प्लीज. सदावर्तेंसोबत मीटिंग झाली का केतकी लवकर परिणाम दिसत आहे. एकदा मराठ्यांसोबत मिटींग कर म्हणजे समजेल. अशा कमेंट केल्या आहेत. अनेकांनी केतकीला वातावरण खराब आहे. अशा पोस्ट करू नको, शांत राहा असा सल्ला दिला आहे. पण शांत राहील ती केतकी कसली तिनेही तुम्ही माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करू शकता असा सल्लाच तिने नेटकऱ्यांना दिला आहे. अर्थात काहींनी केतकीची बाजु घेतली आहे. दगड मारणारा शुद्धीत तरी आहे काय? कमाल म्हणजे आज राष्ट्रीय एकता दिन आहे आणि लोकांचे धमकावणे काही संपत नाही. तू कधी एसटीने प्रवास केलंय का आधी सांग? हिंसा मार्ग असू शकत नाही. असे म्हणत केतकीचे समर्थन केले आहे. कला विश्वातून मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळत असताना केतकीचा विरोधाचा सुर अनेकांना पटलेला नाही असे दिसते.

केतकी चितळे नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राज्यात एखादा पेटता विषय असेल, समस्या असेल तेव्हा केतकी हमखास त्यावर भाष्य करते. त्याचबरोबर अशा प्रकारे ट्रोल होण्याची ही केतकीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हिंदीत बोलण्यावरून, युनिफॉर्म सिव्हील कोड सारख्या पोस्टवरून वाद झाला होता. शरद पवार यांच्यावर अर्वाच्य भाषेतली कविता शेअर केल्यामुळे केतकी चितळेला तुरुंगातही जावे लागले होते. यावेळी काही महिलांनी तिच्यावर शाईफेक केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!