Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅयफ्रेंडसाठी तीन मुलींची एकमेकींच्या झिंज्या ओढत हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नेटक-यांनी घेतली शाळा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल सांगता येत नाही. आतापर्यंत सोशल मीडियावरबतरुण आणि तरुणी, महिला आणि पुरुष यांच्या मारामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर बाॅयफ्रेंडवरून शाळकरी मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ जोरदार झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाळा सुटल्यानंतर गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारच्या बाजूला काही विद्यार्थिनी उभ्या आहेत. यामधील एका विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीच्या केसाला धरून ओढायला सुरुवात करते. पण अचानक आणखी एक मुलगी त्यांच्याजवळ येते आणि जोरदार हाणामारी सुरु होते. यावेळी काहीजण त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करतात. पण मुली इतक्या रागात असतात की त्या एकमेकींना हाणामारी करतच राहतात. या मुलींनी एकमेकींचे केस ओढत लाथा-बुक्यांनी मारहाण केली आहे. बॉयफ्रेंडवरुन या तीन मुलींमध्ये ही हाणामारी झाली असल्याचे कारण समोर आले आहे.

सध्या हा व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटक-यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!