Latest Marathi News
Ganesh J GIF

भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक जिंकला तर मी बीचवर….

प्रसिद्ध अभिनेत्रीची सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट, अभिनेत्री जोरदार ट्रोल, २०११ सालच्या या अभिनेत्रीची घोषणा चर्चेत

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना उद्या म्हणजेच नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या महान सामन्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एकही पराभव न स्विकारता अंतिम फेरीत पोहेचलेला भारत जिंकणार की जबरदस्त कमबॅक केलेली ऑस्ट्रेलिया जिंकणार याची चर्चा होत असताना एका अभिनेत्रीने आपल्या बोल्ड विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे.

तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने आपल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणाली की, टीम इंडियाने २०२३ चा वर्ल्ड कप जिंकला तर ती विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर कपड्यांशिवाय फिरेल. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. रेखाने हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर केला आहे. रेखाने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘मंगलयम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलालो’ आणि ‘कलाय तस्मै नम:’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी पूनम पांडेनेही जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर कपड्यांशिवाय फोटोशूट करेल अशी घोषणा केली होती. आता त्याच धर्तीवर तेलुगू अभिनेत्री रेखा बोज हिने ओपन ऑफर दिली आहे. पण या नंतर तिला जोरदार ट्रोल करण्यात आले आहे. अर्थात अशा घोषणा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच अभिनेत्री पायल घोषने मोहम्मद शमीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तर पाकिस्तानी अभिनेत्रीने विश्वचषकादरम्यान बांगलादेश संघाने भारताला हरवले तर ती एका बंगाली मुलासोबत फिश डिनरसाठी जाईल. असा प्रस्ताव ठेवला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ २० वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. २००३ मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्याचा बदला घेण्याची संधी भारताला मिळाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!