‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये दम असेल तर इकडे या’
कर्नाटकातील संघटनेचे शिंदे सरकारला चॅलेंज,महाराष्ट्र विरोधात घोषणाबाजी
बेळगाव दि ७(प्रतिनिधी)- कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरु आहे. कर्नाटककडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत असून कर्नाटक सरकार त्यांची पाठराखण करत आहे. पण त्याच वेळी महाराष्ट्र सरकारकडून मात्र संयमाची भूमिका घेतली जात आहे. यावेळी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करणाऱ्या कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने थेट शिंदे सरकारलाच चॅलेंज दिले आहे.
कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात महाराष्ट्राविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आहे. पण त्यांच्यात दम नाही, महाराष्ट्रातील लोकांमध्ये दम असेल तर इकडे येऊन दाखवावं, नाहीतर आम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येतो, आणि काय करू शकतो ते दाखवतो असे म्हणत शिंदे सरकारला चॅलेंज दिले आहे. या संघटनेकडूनच काल महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करत तोडफोड करण्यात आली होती. आता त्यांनी थेट सरकारलाच आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकने दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगाव दाैरा आयोजित केला होता. पण कर्नाटक सरकारच्या इशा-यानंतर तो रद्द करण्यात आला होता. पण वेदिकेकडुन मात्र बेळगावात धुडगूस घातला जात आहे.