Just another WordPress site

राज्यपालांविरोधात शिवप्रेमींची या दिवशी पुणे बंदची हाक*

भाजपा वगळता सर्वपक्षांचा बंदला पाठिंबा, कोण होणार बंदमध्ये सहभागी

पुणे दि ७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग घेण्याचे जाहीर केले आहे. यावेळी सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात, आले आहे.

GIF Advt

पुण्यातील एसएसपीएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनीची बैठक आयोजित केली होती. यावेळी १३ डिसेंबरला होणाऱ्या बंदला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे संजय मोरे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, रवी आरडे, सुजित यादव, अंजूम इनामदार यांच्यासह वेगवेगळ्या सामाजिक, स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहत पाठिंबा दिला आहे. भाजपा आणि शिंदे गट मात्र या बंदमध्ये सहभागी होणार नाही. केंद्र सरकारने कोश्यारी यांना त्वरित राज्यपालपदावरून हटवावे, यासाठी पुणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी यासाठी हा बंद असल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील संस्था, सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये जाऊन तिथे सर्वपक्षीय भूमिका स्पष्ट करून त्यांचा बंदला पाठिंबा मिळवण्यात येणार आहे. त्याची सुरूवात आजपासून करण्यात आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांसह अनेक संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पीएमटी सेवा बंद राहण्याची शक्यता असल्याने पुणेकरांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!