भाजपा मंत्र्यासमोरच भाजपातील दोन गटात जोरदार राडा
दोन गटातील चकमकीचा व्हिडिओ व्हायरल, स्थानिक वादा भाजपाची डोकेदुखी वाढली
पालघर दि २(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत असूनही भाजपाला आपला पक्षाअंतर्गत वाद समोर आला आहे. पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात भाजपातील दोन गटातील वाद समोर आला आहे. डहाणूनगर परिषदचे नगराध्यक्ष भरत राजपूत गट आणि मंत्री रवींद चव्हाण यांच्या गटात जोरदार शाबदिक चकमक झाली आहे. विशेष म्हणजे मंत्री चव्हाण यांच्यासमोरच ही चकमक झाली. सुरुवातीला सुरू झालेला वाद वाढला आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या घटनेनंतर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे पक्षातील कार्यकर्त्यांमधील मतभेदाचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे भाजपाचा पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
शार्दुल ठाकूरने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. त्याने मितालीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या स्वागत समारंभासाठी भाजपसहित इतर राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील शार्दुलच्या लग्नाला हजेरी लावली होती. पण त्यात भाजपातील वादाने याला वेगळे वळण मिळाले आहे.