विद्यार्थ्यांसमोर तीन महिला शिक्षकांची झिंज्या उपटत हाणामारी
धक्कादायक हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, प्रशासनाची कारवाई
उत्तर प्रदेश दि ५(प्रतिनिधी)- शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात.सक्षम नवीन पिढी घडवताना त्यांना संस्कार देत असतात. पण उत्तरप्रदेशमधगये एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एका मुलींच्या माध्यमिक शाळेत ३ शिक्षिका एकमेकांना भिडल्या. तिघींमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. घडलेली घटना अशी की,शाळेत गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू होता. शाळेतील मुली विद्यार्थी नृत्य, गाण्याचे कार्यक्रम करत होते. पण आवाज मोठा झाल्याने त्या शाळेच्या मुख्यध्यापिका तेथील शिक्षकेवर ओरडण्यास सुरुवात केली. तर हे पाहून दुस-या शिक्षकाने त्या भांडणाचे शूटिंग काढण्यास सुरुवात केली, त्यामुळे मुख्यध्यापिका चिडल्या त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. पुढे त्याचे रूपातंर हाणामारीत झाले. यावेळी शाळेतील मुलांनी तिघींना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही शिक्षिका भांडतच राहिल्या. एैन गांधी जयंती म्हणजे अहिंसा दिनादिवशीच शिक्षकांनी हिंसा करत गैरवर्तन केले आहे.
प्रकरण समोर आल्यानंतर तिन्ही शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण शिक्षकांनीच हाणामारी केल्यामुळे हे विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.