पुण्यात पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी
अपहरण करणाऱ्यांनी पतीच्या घरीच केली चोरी, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव, नक्की काय घडले?
पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीपासुन वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने केलेल्या कारणाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने याची सुपारी घेतली होती. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
प्रदीप मारुती जाधव असे पतीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे जनावरांचे डॉक्टर आहेत. त्यांची आणि पत्नीची घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात केस चालू आहे. बुधवारी जाधव यांना फोन आला होता. वडकी गायकवाड रोड या ठिकाणी एक कुत्रे आजारी पडले आहे, त्याचा उपचारासाठी बोलवण्यात आले होते. जाधव त्या ठिकाणी केले असता दोन तीन लोकांनी त्यांना जबरदस्तीने नंबर प्लेट नसलेल्या एका चारचाकी गाडीत बसवले आणि अपहरण केले. नंतर जाधव यांच्या गळ्याला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी आणि मेहुण्याने सुपारी दिली आहे. तुला आम्ही संपून टाकणार आहोत. तू आम्हाला वीस लाख रुपये दिले तर आम्ही तुला सोडू. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असे म्हटले. त्यानंतर त्यांनी जाधव यांच्या घरी जात जबरदस्तीने घरातील दागिने आणि रोख रक्कम अशी सत्तावीस लाख दहा हजार रुपये घेऊन गेले. त्यानंतर जाधव यांनी तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.
पोलिसांनी याप्रकरणी १० अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पण या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.