Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मिडीया स्टार वाद प्रकरणी न्यायालयाची पृथ्वी शॉला नोटीस

आयपीएलमध्ये सुमार कामगिरी करणारा पृथ्वी शाॅ अडचणीत, या तरूणीने केलेली तक्रार

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावरील बहुचर्चित आणि प्रख्यात सपना गिल हिचा आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचा वाद झाला होता. सांताक्रुज येथील हॉटेलच्या बाहेर त्यांच्याच बाचाबाची झाली तसेच मारहाण देखील करण्यात आल्याचा आरोप एकमेकांनी केला होता. पण आता पृथ्वी शाॅच्या अडचणी वाढल्या आहेत.

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून मुंबईत १५ फेब्रुवारीला वाद झाला होता. या वादातून पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला केला. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी सपना गिल हिने दाखल केलेल्या याचिकेवर पृथ्वी शॉ याला मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यावेळी पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यांचे मुंबई सांताक्रुज येथे एक छोटेसे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये ते उपस्थित असताना सपना गिल त्या ठिकाणी हजर झाली. सपना गिलला तिच्या एका मित्राने सांगितले की, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ त्याचे ते हॉटेल आहे आणि त्याच्यासोबत एक सेल्फी घे. मला माहिती देखील नव्हते की, पृथ्वी शॉ हा कोण आहे? काय आहे? पण सेल्फी घेण्याचा मी प्रयत्न केला असता पृथ्वी शॉने तिच्यासोबत बाचाबाची, अरेरावी केली आणि धक्काबुक्की देखील केली. अशा प्रकारे सपना गिलने तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या घटनेनंतर पोलिसांकडून सपना गिल हिला अटक करण्यात आली होती. परंतु २० फेब्रुवारी २०२३ रोजी तिला जामीन देखील मिळाला. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. पण पृथ्वी शाॅच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकीकडे आयपीएल क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे संकटात असलेल्या पृथ्वी शॉच्या अडचणी दिवसेंदिवस आणखी वाढत आहेत. सपना गिल सेल्फी वादाच्या प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉला नोटीस पाठवली आहे. पृथ्वी शॉसह ११ जणांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!