भारताचा स्टार क्रिकेटर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
मुंबईत पार पडणार विवाह सोहळा, पहा मराठमोळ्या क्रिकेटरची पत्नी आहे कोण?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सध्या अनेक सेलिब्रेटी लग्नाचा धडाका उडवून देत लग्न करत आहेत. नुकताच भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सुनिल शेट्टीची मुलगी अथाया बरोबर लग्नाच्या बेडीत अडकला. आता त्यानंतर भारताचा मराठमोळा क्रिकेटर शार्दुल ठाकूर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
शार्दुल २७ फेब्रुवारीला त्याची मैत्रीण मिताली परुळकर सोबत लग्न करणार आहे. शार्दुलची पत्नी मिताली ही बिझनेस वुमन आहे. त्याचबरोबर तिने मॉडेलिंगही केले आहे. एवढेच नाही, तर तिने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे. शार्दुलने मितालीबरोबर नोव्हेंबर २०२१ मध्ये तिच्यासोबत साखरपुडा केला होता. दोघांचे लग्न महाराष्ट्रातील परंपरेने होणार आहे. महत्वाच्या पाहुण्याच्या उपस्थिती हे दोघे लग्न करणार असून या लग्नाला अनेक विशेष मान्यवर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याच्या लग्नाचा सोहळा मुंबईत होत आहे. त्याआधी हळदी समारंभात शार्दुल ठाकूर त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांसह झिंगाट गाण्यावर नाचताना दिसला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या जोडप्याला गोव्यात लग्न करायचे होते, पण ये-जा करताना येणाऱ्या अडचणींमुळे दोघांनी मुंबईजवळ लग्न करण्याचा निर्णय घेतला आता मराठी भाषा दिनादिवशी दोघे लग्न करणार आहेत.

शार्दुल आणि मिताली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या शार्दुल ठाकूरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. तो वनडे मालिकेत सहभागी होणार आहे.या लग्न समारंभाला भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा संपत्नीक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.