Latest Marathi News
Ganesh J GIF

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला

शरद पवार अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते, शरद पवार यांच्यावर कोणी केला हल्लाबोल

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. अशा शब्दात भाजपाने शरद पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे. विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही. धार्मिक राजकारणाचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर १३ व्वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाल्याचा कांगावा मतं मिळवण्यासाठी तुम्ही केला होता. अशा शब्दात भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्विकारले नाही. तुम्ही अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते आहात. असेही भाजपाने आपल्या x पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://x.com/bjp4maharashtra/status/1716383334971113503?s=48&t=yN4NDAcqXYHcL_Rp6w09WQ

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!