Latest Marathi News
Ganesh J GIF

तु खुप ****आहेस माझी मैत्रीण बनशील का?

तरुणाचे रशियन तरुणीसोबत गैरवर्तन पाठलाग करत केली अश्लील शेरेबाजी, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीत आलेल्या पाहुण्यांना सन्मान देण्याची परंपरा आहे. पण सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका तरूणाने दिल्लीत एका रशियन तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमध्ये हा प्रकार घडला आहे. एक रशियन युट्युबर भारतात आली होती. तिचे युट्युबवर ‘कोको इन इंडिया’ या नावाने चॅनेल आहे. ती दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमध्ये व्लॉगिंग करत असताना एका अज्ञात तरुणाने तिचा पाठलाग केला. यावेळी त्या तरूणाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. रोज मी तुमचे व्हिडिओ पाहतो, असं तो युवक म्हणाला. हे ऐकल्यानंतर कोको आधी खुश झाली. पण लगेचच त्याने गैरवर्तन सुरु केलं. तो तिला मित्र बनवण्यासाठी बळजबरी करत होता. पण हद्द तेंव्हा झाली जेंव्हा युवक कोकोला म्हणाला की, “तू खूप सेक्सी आहेस” असे म्हटल्यावर मात्र तिने तेथून जाणेच पसंद केले. हा संपूर्ण प्रकार रशियन तरुणीने शूट केला असून याचा व्हिडीओ स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतापले. अशा लोकांमुळे भारताची बदनामी होते, असं युजर्सच मत आहे. तसेच त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

परदेशातील तरुणींसोबत याआधी देखील अनेकवेळा छेडछाड होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर मागे एकदा मुंबईत होळीच्या काळात एका परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन करण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोलीसांनी कारवाई देखील केली होती. दिल्लीतील या प्रकारानंतर संबंधित तरुणाविरोधात कारवाई झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!