‘त्या उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं’
अजित पवारांचा सुषमा अंधारेंवर पलटवार, म्हणाले काकारे, बाबारे, मामारे करण्यापेक्षा...
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- महिलांबाबत अश्लिल शब्दात राज्यातील मंत्री टिका करीत आहे. ही बाब विधीमंडळात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायला हवी होती. असं म्हणत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार यांचं गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी अंधारे यांना रडू देखील कोसळले होते. यावर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे आहेत. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करतात. त्यांच्या उद्धव ठाकरेंना सांगा. उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या आण अंबादास दावनेंंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते. विधानसभा विरोधी पक्षनेत्याप्रमाणे विधान परिषदेच्या पक्षनेत्यालाही अधिकार असतात. अशा शब्दामध्ये अजितदादांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे. त्यांना सांगा इथं रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे रडल्या असता तर जास्त योग्य ठरलं असतं, असा टोला देखील अजितदादांनी त्यांना लगावला आहे. अजित पवारांनी पत्रकारांची बोलताना सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
एका छोटेखानी सुषमा अंधारे यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आल्या. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी महिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्याची तक्रार शरद पवार यांच्यासमोरच केली. त्यावेळी सुषमा अंधारे ह्या शरद पवारांसमोरच भावूक झालेल्या दिसून आल्या होत्या.