पुणे दि १२(प्रतिनिधी)- आपल्या नृत्याने तरुणाईला वेड लावणारी, सबसे कातील गाैतमी पाटीलला पुणे पोलिसांनी धक्का दिला आहे. पुण्यातील शिवणे येथे गौतमीचा कार्यक्रम होती. शिवणे येथील धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटीलच्या हस्ते होणार होते. पण एैनवेळी पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
शिवणेतील देशमुखवाडी भागात एका राजकीय पक्षााच्या कार्यकर्त्याने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता होती तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. पण मध्यंतरी अजित पवार यांनी गाैतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेतला होता. तसेच यावर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या कार्यक्रमात अशा नृत्याचे आयोजन करु नका असे आदेश दिले होते. त्यामुळे तर एैनवेळी परवानगी नाकारली नसेल ना? असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठी मनोरंजनविश्वामध्ये गौतमी पाटीलचा जोरदार बोलबोला सुरू आहे. सध्या गौतमी पाटीलने तिच्या नृत्यकेलेने मार्केट जाम केलं आहे. आता पुन्हा एकदा गौतमी नव्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. गौतमी पाटीलने नृत्य कौशल्याने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.