Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेमी युगलाचा धावत्या बाईकवर जीवघेणा स्टंट

व्हिडिओ व्हायरल होताच पोलीसांनी शिकवला धडा, अशी घडवली अद्दल

विशाखापट्टणम दि ३१(प्रतिनिधी)- आजकाल काही तरुण तरुणी अल्पकाळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत.त्याचबरोबर त्यांनी केलेले कारनामे सोशल मिडीयामुळे व्हायरल देखील होत आहेत. नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यांना पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

सोशल मीडियात एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी एका चित्रपटातील सीन रिक्रिएट केला होता. ज्यात एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. हा स्टंट कदाचित त्यांच्या जिवावर बेतू शकला असता पण त्या दोघांच्या रोमान्सचा तो व्हिडिओ कुणीतरी बनवला आणि तो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. स्टंट करणाऱ्या या जोडप्याला नेटक-यांनी जोरदार ट्रोल केले आहे. तर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे. अनेकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी दखल घेत या युवकास चागंलाच धडा शिकवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.अजय कुमार आणि शैलजा अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या पालकांनाही समज देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!