शिंदे गटातील ‘या’ आमदाराच्या मुलाकडून थेट हातपाय तोडण्याची धमकी
शिंदे गटातील आणखी एक आमदार वादात, धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
ओैरंगाबाद दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील नेते वादग्रस्त ठरले आहेत. तसेच ते वादात देखील सापडत आहेत. त्यात आता आमदार पुत्रांची देखील मग्रुरी समोर येत आहे. औरंगाबादेतील शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांच्या मुलाने एका केटरिंग व्यावसायिकाला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे.
संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाठ यांनी केटरिंग चालकाला धमजावले आहे. संजय शिरसाठ यांनी २०१७ साली आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला केटरिंग व्यावसायिक त्रिशरण गायकवाड यांना ऑर्डर दिली होती. त्यावेळी त्याचे साडेचार लाख बिल झाले होते. त्यातील काही रक्कम शिरसाठ यांनी दिली. पण उरलेल्या रकमेसाठी देताना मात्र टाळाटाळ करु लागले.अखेर गायकवाड यांनी शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार ७५ हजारांची सूट दिली. त्यानंतर ४० हजार रुपये देण्याचं त्यांनी कबूल केले.पण जेंव्हा गायकवाड पैसे आणायला गेले तेंव्हा त्यांना २० हजार देण्यात आले.यावर गायकवाड यांनी सिद्धांत शिरसाठ यांना फोन केला असता, “साहेबांनी दिले तेवढेच पैसे घे… आता पैसे मागू नको… तुला जर ४० हजार रुपये पाहिजे होते, तर मग आम्ही दिलेले २० हजार रुपये तू का घेतले, तू जर असेच पैसे मागत राहिला तर तुझे हातपाय तोडेन, अशी धमकी सिद्धांत शिरसाठ यांनी त्रिशरण गायकवाड यांना दिली. याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे शिरसाट वादात सापडले आहेत.
सिद्धांत सिरसाट यांना या प्रकरणी विचारणा केली असता, त्यांनी सदरील व्यावसायिक हा सात वर्षानंतर ब्लॅकमेलिंग करीत पैसे मागत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.पोलीसांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. पण मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु असताना या क्लिपमुळे शिरसाट अडचणीत सापडले आहेत. त्यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून या क्लिपमुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.