Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटीलांनी उपोषण सोडले

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शिंदेचे आश्वासन, सरकारला जरांगे पाटीलांचा अल्टिमेटम, काय ठरले वाचा

जालना दि १४(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी सरकारने महिनाभरात आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे २९ आॅगस्टपासून उपोषणाला बसले होते. तब्ब्ल १७ दिवसापासून त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी शिष्टमंडळाकडून सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून जीआर काढण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी या जीआरमध्ये काही दुरुस्त्यात सुचवल्या होत्या. तेव्हाच उपोषण मागे घेतले जाईल असे म्हणले होते. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. पण अखेर जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असं म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे कालच उपोषण स्थळी जाणार होते. पण काल ते तेथे गेले नव्हते. पण शिंदे आज जालन्यात दाखल झाले. दरम्यान आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये आहे. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणखी 10 दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे आणि आणखीन वेळ वाढवून देईल पण आरक्षण घेणार, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. तथापी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर इत्याही नेते उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. पण त्याबाबत फारसे कोणाला माहितीच नव्हते. पण जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मात्र हे उपोषण राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे सरकारला देखील याची दखल घ्यावी लागली होती. पण आज शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मात्र अनुपस्थित होते. पण त्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!