Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…

भाजपाच्या दाव्याने राष्ट्रवादी व शिंदे गटात अस्वस्थता, राज्यात पुन्हा राजकीय भुकंपाची शक्यता

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे. पण भाजपानेही आपली रणनिती आखत आॅपरेशन लोटस राबवण्याच्या मनस्थितीत आहे. तसे संकेत भाजप नेत्यांनी दिले आहेत.

भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमच्या संपर्कात तिन्ही पक्षाचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये यायला तयार आहेत. पण आता त्यांना पक्षात आणून फायदा नाही, कारण त्यांचे सदस्यत्व रद्द होईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच मी कोणाचं नाव घेऊन संशय निर्माण करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांच्या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही जोरदार टोला हाणला आहे. आगामी काळात म्हणजे २०२४ ला निवडणुका होणारच आहे. त्यामुळे निवडणका आता घ्या, उद्या घ्या. असा प्रश्न निर्माण होत नाही. शिल्लक सेनेतील जेवढे शिल्लक आमदार आहेत. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, तिथे अगोदर निवडणुका घेऊन ट्रायल घेऊ. हिमंत असेल तर अगोदर वरळीत अगोदर आपण टेस्ट करू, असे म्हणत आव्हान दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही आमदार काठावर असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील असा टोला हाणला.

रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या टीकेला मुनंगटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जसं पाणी शुद्ध करतो तसं आर्थव्यवस्था शुद्ध. करण्यासाठी नोट बदलणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!