Latest Marathi News
Ganesh J GIF

पतीच्या छळाला कंटाळून हवेली तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

व्यवसायात पतीचा तोटा, पैशासाठी पत्नीला तगादा, कंटाळलेल्या स्नेहलने उचलले टोकाचे पाऊल

पुणे दि २३(प्रतिनिधी)- व्यवसायात झालेला तोटा भरून काढण्यासाठी पतीने माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याने मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. हवेली तालुक्यातील नायगावमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरणात निर्माण झाले आहे.

स्नेहल मयूर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत तिचा भाऊ इंद्रजीत नारायण कांचन याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलचा पती मयूर चौधरी याचा सिमेंटचे पाइप तयार करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायात तोटा झाल्याने त्याने पत्नीला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. स्नेहलने याबाबत घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी म्हणजे स्नेहालच्या भावाने घरातील दुभती गाय विकून मयूरला दोन लाख रुपये दिले होते. तरीही मयुर समाधानी नव्हता. त्यामुळे तो स्नेहाला आणखी पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता. यासाठी तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्यामुळे पतीकडून होणाऱ्या पैशांच्या मागणीला आणि त्रासाला कंटाळून अखेर स्नेहलने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. याची माहिती तिच्या माहेरी समजताच तिच्या भावाने पोलिसात फिर्याद दाखल करत तिच्या सासरच्या लोकांवर आपल्या बहिणीला त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत. दरम्यान विवाहितेच्या आत्महत्येने नायगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!